संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

१३ ते १५ ऑगस्ट घरावर तिरंगा फडकवा! मोदींची ‘मन की बात’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून नागरिकांना केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जन आंदोलनाचे रूप घेत आहे. त्यात सर्व समाज आणि घटकांचे लोक सहभागी होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्वच क्षेत्रात देशाची होत असलेली प्रगती पाहून मला आनंद होतोय. अमृत महोत्सव जन आंदोलनाचे रूप घेत आहे. त्यात सर्व समाजाचे आणि वर्गाचे नागरिक सहभागी होत आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. कोरोना काळात आयुर्वेदिक औषधांच्या शोधात वाढ झाली. अनेक शोध पत्रे प्रकाशित झाली. ही निश्चितच चांगली बाब आहे. परदेशातून खेळणी आयात होण्याचे प्रमाण घटले. या वर्षात खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी कमी झाली. यंदा देशातून ३०० ते ४०० कोटींची खेळणी निर्यात वाढ झाली. २,६०० कोटींची खेळणी यंदा निर्यात झाली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या कर्तव्यांचे निष्ठेने पालन करावे, हा अमृत महोत्सवाचा खरा उद्देश आहे. आमच्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे असेही पंतप्रधानांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami