संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

१५ वर्षांहून जुनी ३ लाख
वाहने भंगारात जाणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली

भारताचे वाहन स्क्रॅपिंग धोरण हे भारताच्या हरित विकास धोरणाचा प्रमुख भाग आहे. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रीन ग्रोथसंदर्भात एक तरतूद करण्यात आली. त्यानुसार काही महिन्यांत १५ वर्षांहून जुनी वाहने स्क्रॅप केली जाणार असून यात सुमारे ३ लाख जुन्या वाहनांचा समावेश असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ग्रीन ग्रोथवरील पहिल्या पोस्ट-बजेट वेबिनारमध्ये बोलताना अर्थसंकल्पीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण एकत्रितपणे आणि झपाट्याने काम करणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्याचबरोबर हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताने तीन टप्पे नियोजित केले आहेत. यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन वाढवणे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेसह पुढे जाणे या उद्दिष्टांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने ग्रीन ग्रोथच्या दिशेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यात इथेनॉल मिश्रण, पीएम कुसुम योजना, सौर उत्पादनास प्रोत्साहन देणे, छतावर सौर योजना, कोळसा गॅसिफिकेशन, ईव्ही बॅटरी स्टोरेज या गोष्टी समाविष्ट असल्याचेही स्पष्ट केले. २०१४ पासूनच भारत हरित क्षमता जोडण्यात सर्वात वेगवान काम करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात जगाच्या ग्रीन इंडस्ट्रीत भारत महत्त्वाचा भाग बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या