नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर आज जाहीर केले. त्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र १९ किलोचा व्यवसायिक गॅस सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडर १९० रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला. त्यामुळे मुंबईत व्यवसायिक गॅस सिलिंडर १,९८१ रुपये झाला आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर आज जाहीर झाले. त्यात दिल्लीत इंडेनचा गॅस सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलकात्यात १८२ रुपये, मुंबईत १९० रुपये ५० पैसे आणि चेन्नईत १८७ रुपयांनी हा गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. मात्र १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.