संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

१ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडसह पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- अगोदरच महागाईने बेजार झालेल्या पिंपरी-चिंचवड, पुणे आणि बारामतीकरांना आता रिक्षा भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. १ ऑगस्टपासून त्यांचा रिक्षा प्रवास २ रुपयांनी महागणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने या भाडेवाढीला परवानगी दिली आहे.
सीएनजीच्या दरात सतत होणारी वाढ, रिक्षाचे महागलेले सुटे भाग, देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च. यामुळे रिक्षा चालकांच्या संघटनांनी भाडेवाढीची मागणी आरटीओकडे केली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी २ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी एक रुपया भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नवीन भाडेवाढ १ ऑगस्टपासून लागू करण्याची परवानगी आरटीओने दिली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami