संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

१ डिसेंबरपासून राष्ट्रपती भवन नागरिकांसाठी खुले होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवन येत्या १ डिसेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या आठवड्यातील ५ दिवशी नागरिकांसाठी ते खुले राहणार आहे. त्याच्या वेळाही जाहीर केल्या आहेत.
राष्ट्रपती भवन आणि त्याचे संग्रहालय संकुल सामान्य नागरिकांसाठी आठवड्यातून ५ आणि ६ दिवस खुले ठेवण्यात येणार आहे. राजपात्रित सुट्टी वगळता ते खुले राहणार आहे. सकाळी १० ते ११, ११ ते १२, १२ ते १, २ ते ३ आणि सायंकाळी ३ ते ४ या वेळा जाहीर केल्या आहेत. मंगळवार ते रविवार दरम्यान राजपात्रीत सुट्ट्या वगळता आठवड्यातून ६ दिवस राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुल नागरिकांसाठी खुले राहणार आहे. दर शनिवारी नागरिकांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी ८ ते ९ या वेळेत ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा पाहता येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami