संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

१ मार्चपासून अनेक बदल! नागरिकांना भुर्दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- येत्या १ मार्चपासून बँक कर्ज, एलपीजी सिलेंडर, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींबाबत मोठ्या बदलांची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरवाढ केली. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एमसीएलआर दरात वाढ केली. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. वाढते व्याजदर, एलपीजी सिंलेंडर दरवाढ यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहेत. एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसाठी गॅसचे दर प्रत्येक महिन्याला ठरवले जातात. यंदा एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ होणार आहे. १ मार्चपासून ५ हजार मालगाड्या आणि हजारो प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यानुसार नवे वेळापत्रक मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यात सणवार, साप्ताहिक रजांसह १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्या. त्यानुसार ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइट्सना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या