संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

१.६० कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प अखेर गुजरातला!महाराष्ट्राचे अपयश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- सुप्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांचा वेदांता समुह तैवानच्या फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार आहे.मात्र सुमारे १ लाख ६० लाख कोटी इतकी प्रचंड गुंतवणूक असणारा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला आहे.हा प्रकल्प आपल्या राज्यात उभारण्यासाठी गुजरात सरकारने बाजी मारली आहे.त्यासाठी या सरकारने या कंपनीवर विविध सवलतींची बरसात केली आहे.
जगभरातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टर चीप या उपक्रमाची अत्यंत आवश्यकता असते आणि त्याची निर्मिती एकट्या तैवान देशात फॉक्सकॉन ही कंपनी करत असते.आता भारतातील वेदांता कंपनी हा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प भारतात उभारणार आहे. त्यासाठी विविध राज्यात चाचपणी करण्यात आली होती.महाराष्ट्रातही वेदांत कंपनीने सुरुवातीला विशेष पसंती दाखवली होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकही झाली होती.मात्र यात महाराष्ट्र सरकारला अपयश आले असून गुजरातने हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला आहे. गुजरातने त्यासाठी या कंपनीला प्रकल्प सुरू झाल्यानंतर वीज आणि पाणी २० वर्षे सवलतीच्या दरात देण्याची तयारी दर्शविली आहे.तसेच या प्रकल्पासाठी ९९ वर्षांचा करार करण्यात आला असून १ हजार एकर जमीन सरकार या कंपनीला मोफत देणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami