संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

 २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा लवकरच बंद होणार ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणाची शक्यता आहे. कारण,शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत?संबंधित शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
२०१७ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या राज्यातील ३३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami