संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

२१७ किलोमीटरचे अंतर पार; पुणेकर आशिष कासोदेकरांची यशस्वी मॅरेथॉन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन – पुणेकर आशिष कासोदेकर यांनी नुकतीच एक अवघड मॅरेथॉन पूर्ण करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ‘ॲडव्हेंचर कॉर्प्स’ या संस्थेतर्फे ११ ते १३ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन त्यांनी ३८ तास २४ मिनिटे आणि २६ सेकंदांत पूर्ण केली. यंदा सहभागी झालेल्या ९४ स्पर्धकांमध्ये ते एकमेव भारतीय स्पर्धक होते. विशेष म्हणजे केवळ ७८ स्पर्धकांनाच ही मॅरेथॉन पूर्ण करता आली. त्यात पहिल्याच प्रयत्नात ‘एव्हरेस्ट’वर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम नावावर असलेल्या कासोदेकर यांनी ४०वा क्रमांक मिळवला.

‘बॅडवॉटर १३५’ असे या मॅरेथॉनचे नाव असून ती साल १९८७ पासून दरवर्षी उत्तर अमेरिकेत जुलै महिन्याच्या मध्यात आयोजित केली जाते. रात्री आठ वाजता डेथ व्हॅलीतील बॅडवॉटर बेसिनपोपासून ही मॅरेथॉन सुरू होते आणि २१७ किलोमीटरचे अंतर पार करून ती माऊंट व्हिटनी येथे संपते. पाच टप्प्यांमध्ये ती विभागलेली असून स्पर्धकांकाणी कमाल ४८ तासांमध्ये हे अंतर पूर्ण करणे अपेक्षित असते. दरवर्षी जगभरातील धावपटू या मॅरेथॉनसाठी अर्ज करतात. मात्र त्यासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या धावपटूंनाच यात सहभागी होण्याची संधी मिळते.

दरम्यान, ‘मला नवनवीन आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करायला नेहमीच आवडते’, असे म्हणणाऱ्या ५० वर्षीय कासोदेकर यांना सायकलिंग आणि बास्केटबॉलसह विविध मैदानी खेळांची आवड आहे. गेली अनेक वर्ष ते विविध शर्यतींमध्ये भाग घेत आहेत. मॅरेथॉनमधील काही विक्रमही त्यांच्या नावावर आहेत. यंदा वर्षाच्या सुरुवातीला सलग ६१ दिवस ६१ मॅरेथॉन धावण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला होता. तसेच ‘ब्राझील १३५ ट्रेल रन’ पूर्ण करणारे ते दुसरे भारतीय आहेत. तर, लडाखमधील ‘ला अल्ट्रा मॅरेथॉन’ पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami