संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

३०८ वर्षांनंतर इस्लामनगरचे नाव पुन्हा ‘जगदीशपूर’ होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ.- भोपाळच्या इस्लामनगरचे नाव मध्य प्रदेशात बदलण्यात आले असून याचे नाव आता ‘जगदीशपूर’ करण्यात आले. तीन दशकांपासून सुरू असलेली नाव बदलण्याची मागणी अखेर पूर्ण झाली. केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल मिळताच राज्य सरकारनेही बुधवारी अधिसूचना जारी केली.आता फांडा जिल्ह्यातील गाव पंचायत इस्लामनगर हे त्याच्या जुन्या ‘जगदीशपूर’ या नावाने ओळखले जाणार आहे.

भोपाळ शहरापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. ३०८ वर्षांपूर्वी १७ व्या शतकात जगदीशपूरवर औरंगजेबाच्या सैन्यातील फरारी सैनिक दोस्त मोहम्मद खानने हल्ला केला आणि त्याचे नाव इस्लामनगर ठेवले. मात्र, आता पुन्हा एकदा याचे नाव ‘जगदीशपूर’ असे करण्यात आले आहे. या गावाचे नाव बदलण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून सुरू होती.

१७ वर्षांपूर्वी येथील पंचायतीने सरकारला पत्र लिहून जगदीशपूर असे नामकरण करण्यास पत्र लिहिण्यात आले होते. गेल्या वर्षीही हा मुद्दा पुन्हा चर्चेत होता. हजूरच्या आमदारांसह भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. नाव बदलाची अधिसूचना जारी झाल्यानंतर मोठ्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. या कार्यक्रमाला भोपाळचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बेरसियाचे आमदार विष्णू खत्री, भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर, हुजूरचे आमदार आणि पुरातत्व विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या