संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

३२ वर्षांनी काश्मीरींना मनोरंजनाची मेजवानी! मल्टिप्लेक्स थिएटर सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर- काश्मीरमध्ये जवळपास ३० दशकानंतर म्हणजे ३२ वर्षांनी आज चित्रपटगृहे सुरू झाली. लेफ्टनंट जनरल मनोज सिन्ह यांनी काश्मीर खोऱ्यातील पहिल्या मल्टिप्लेक्सचे आज उद्घाटन केले. रविवारी त्यांनी दक्षिण काश्मीरच्या शोफिया आणि पुलवामा जिल्ह्यात थिएटर सुरू केली होती. यामुळे काश्मीरींना मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये आमीर खानचा लाल सिंग चड्डा चित्रपट दाखवला जाणार आहे.

अतिरेकी कारवायांमुळे जम्मू-काश्मीरमधील थिएटर ३२ वर्षांपासून बंद आहेत. १९९० मध्ये काही सिनेमागृह सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात यश आले नाही. सप्टेंबर १९९० मध्ये रिगल सिनेमावर बॉम्बहल्ला झाला होता. अतिरेकी थिएटर मालकांना धमक्या देत होते. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील थिएटर बंद होती. १९८० पूर्वी डझनभर थिएटर तेथे सुरू होती. आज उद्घाटन झालेल्या मल्टिप्लेक्समध्ये तीन स्क्रीन आहेत. तेथे ५२२ प्रेक्षकांना एकावेळी चित्रपटाचा आनंद लुटता येईल. काश्मीरमध्ये काहीसे चित्रीकरण झालेला आमिर खानचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला सैफ अली खान आणि ऋतिक रोशनचा विक्रम वेदा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन शो दाखवले जात आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि परिस्थिती लक्षात घेऊन नंतर त्यात बदल केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami