संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

३४ पैकी दोनच डॉक्टर उपस्थित, नायर रुग्णालयाला भाजपा नगरसेवकांची अचानक भेट

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – नायर रुग्णालयात वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये सिलिंडरच्या स्फोटात होरपळून चार महिन्यांच्या बालकाचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज सकाळी भाजपाचे विनोद मिश्र यांच्यसह भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवाडकर आणि रोहिदाश लोखंडे यांनी नायर रुगालायला सकाळी 8.15 वाजता अचानक भेट दिली. त्यावेळी 34 पैकी 2 डॉक्टर उपस्थित होते, अशी माहिती भाजपाचे विनोद मिश्र यांनी ट्वीट करून दिली आहे. नायर रुग्णालयात केवळ दोन डॉक्टर हजर असणे अतिशय धक्कादायक असून सत्ताधारी शिवसेना और प्रशासन मस्त, जनता त्रस्त असे मिश्रा यांनी म्हटले आहे.

वरळीच्या घटनेनंतर रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी भाजप नगरसेवक रुग्णालयांना अचानक भेटी देणार आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा आढळून आल्यास रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत. त्यानुसार आज नायर रुग्णालयाला भेट दिली होती. यापुढे पालिकेच्या विविध रुग्णालयांना भाजपाचे पथक अचानक भेटी देणार आहेत.

नायर रुग्णालय आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मुंबई पालिकेच्या आरोग्य समितीचे राजीनामे दिले. पालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि रुग्णालयांना मुंबईकरांची चिंता नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवक जनतेच्या आरोग्याची काळजी घेतील, असे भाजपाने म्हटले असून मुंबईकरांच्या आरोग्यविषयक मदतीसाठी भाजपने हेल्पलाइन क्रमांक ९१-८५९१२४४७४२ जारी केला आहे. लोकांच्या मदतीसाठी 12 नगरसेवकांची तीन टीम तयार करण्यात आली असून ते लोकांना मदत करतील, असे भाजपाने म्हटले आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते शहरातील नील सोमय्या, हर्षिता नार्वेकर, राजुल देसाई आणि पश्चिम उपनगरातील प्रियांका मोरे, बिना दोषी, सुनीता मेहता, योगिता कोळी आणि मुमताज खान यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. पूर्व उपनगरात बिंदू त्रिवेदी, सारिका पवार, अनिता पांचाळ, प्रकाश मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami