संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

५५ हजारांपैकी ४८ हजार झेंडे खराब! वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – “हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी पुणे महापालिकेकडून धनकवडी प्रभाग कार्यालयात आलेल्या ५५ हजार २०० झेंड्यांपैकी ४८ हजार ९४३ म्हणजे जवळपास ९० टक्के झेंडे खराब होते, असा गौप्यस्फोट मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी केला. यातील केवळ ६ हजार २५७ झेंडे चांगले होते. मग यात दोष कुणाचा असा सवाल त्यांनी केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा’ संकल्पना मांडली. नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करण्याच्या हेतूने त्यांनी ही संकल्पना मांडली. त्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांना घरावर झेंडे फडकावून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अशाप्रकारे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत पहिल्यांदा संपूर्ण देश तिरंगा होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. हर घर तिरंगासाठी पुणे महापालिकेकडे ११ लाखांपेक्षा जास्त झेंडे आले. त्यात जवळपास ५ लाख झेंडे पुणे परिसरातील कंपन्यांनी दिले. महापालिकेने ३ लाख झेंडे विकत घेतले. राज्य सरकारकडून २.५ लाख झेंडे मिळाले. महापालिकेने हे झेंडे विभागीय कार्यालयांकडे वाटण्यासाठी पाठवले. त्यातून धनकवडीच्या सहकार नगर येथील विभाग कार्यालयात ५५ हजार २०० झेंडे आले. तेव्हा कार्यक्रमात झेंडे लावण्यासाठी व लोकांना वाटण्यासाठी मी प्रभाग कार्यालयाकडे २०० झेंडे मागितले. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. प्रभाग कार्यालयाला मिळालेल्या ५५ हजार २०० झेंड्यांपैकी ४८ हजार ९४३ झेंडे खराब होते. म्हणजे केवळ ६,२५७ झेंडे चांगले होते, असा गौप्यस्फोट मोरे यांनी केला. मग यात दोष कुणाचा असा सवाल त्यांनी विचारला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami