संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

५ तालुक्याच्या रस्त्यातील खड्ड्यांसाठी २८ ऑक्टोबरला सावंतवाडीत आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग,वेंगुर्ले,मालवण आणि कुडाळ या पाच तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था अवस्था झाली आहे.या रस्त्यांमध्ये सर्वत्र खड्डे पडल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तरी या रस्त्यांवर जर अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत एकंदर या खड्ड्यांच्या प्रश्नावर येत्या २८ ऑक्टोंबर रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर सेवादल कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात एक निवेदनही प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना देण्यात आले आहे.

या आंदोलनासंदर्भात निवेदन देताना कॉंग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष संजय लाड,विशाल राउळ, सुर्यकांत राउळ,जोकी डिसोजा,रोहित गोताड , आशिष राउळ,संतोष, राउळ,पराग करपे,राजन देसाई,आत्माराम लातये, समीर घाडी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे या रस्त्यांवर अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभाग यांच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी या शिष्टमंडळाने करत ही मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी दिला .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami