चंदीगड – रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवर ५ रुपये जास्त घेणाऱ्या रेल्वे स्टोलधारक कंत्राटदाराला रेल्वेने १ लाखांचा दंड ठोठावलेला आहे. एका प्रवाशाच्या तक्रारीवरून हा दंड ठोठावण्यात आला.
रेल्वे स्थानकावर असलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पदार्थांची किंमत रेल्वेने निश्चित केलेली आहे. अशावेळी मूळ किमतीपेक्षा प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या स्टालधारक कंत्राटदाराला दंड आकारला जातो. चंदीगड वरून शहाजापूरला जाणाऱ्या एका प्रवाशाला पिण्याच्या पाण्याची बाटली घ्यायची होती. मात्र स्टॉल धारकाने त्याच्याकडून १५ ऐवजी २० रुपये घेतले. त्यामुळे स्टॉल धारकांसोबत त्याचा वाद झाला त्यानंतर त्याने या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली . या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन अंबालाचे डीआरएम यांनी कंत्राटदार चंद्रमौळी मिश्रा याना १ लाखांचा दंड ठोठावला आहे.