संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

६० वर्षानंतर हंगेरीचा इंग्लंडवर पहिला विजय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – १९६२ नंतर तब्बल ६० वर्षानंतर हंगेरीच्या फुटबॉल संघाने इंग्लंडवर पहिला विजय नोंदवला आहे . या पूर्वी या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात तब्बल १५ वेळा इंग्लंडने हंगेरीचा पराभव केला होता. त्यामुळे ६० वर्षानंतर मिळालें हा विजय हन्गेरीसाठी ऐतिहासिक विजय आहे.
१९६२ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत हंगेरीने इंग्लंडचा पराभव केला होता . त्यानंतर इंग्लंडवर विजय मिळवण्यासाठी हंगेरीला तब्बल ६० वर्ष प्रतीक्षा करावी लागली. नेशन लीग फुटबॉल स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध हंगेरी आमने सामने होते. रीस जेम्सच्या फाऊल नंतर हंगेरीला दुसर्या हाप मध्ये ६६ व्या मिनिटाला पेनल्टी करणार मिळाला त्याचे दोमेनिक सोबसालायी याने गोल मध्ये रुपांतर केले आणि हंगेरीला ६० वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळाला हंगेरी विरुद्ध १५ सामने जिंकल्यानंतर १६ व्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला तर सलग २३ सामने जिंकल्यानंतर इंग्लंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami