संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

८ बिगर बँकिंग वित्तीय संस्था बंद; नोंदणी परवाने आरबीआयकडे परत

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – ८ बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसह एका गृह फायनान्स वित्तीय कंपनीने आपले परवाना प्रमाणपत्र भारतीय रिझर्व्ह बँकेला परत केले आहे. त्यामुळे आता त्यांना कोणताही कारभार करता येणार नाही. या बिगर वित्तीय संस्थांमध्ये मुंबईतील इंडी होमफिन प्रायव्हेट लिमिटेडने राष्ट्रीय आवास बँक आणि आरबीआयने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र परत केले आहे.

कोरोनाचा लॉकडाऊन आणि इतर अनेक कारणांमुळे बिगर बँकिंग वित्तीय संस्था अडचणीत आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बँका आणि वित्तीय संस्थांवर करडी नजर ठेवली आहे. त्यात आतापर्यंत अनेक बँकांवर नियम मोडल्याप्रकरणी दंडाची कारवाई केली आहे. या सर्व प्रकारामुळे ८ गैर बँकिंग वित्तीय संस्थांनी आरबीआयला परवाने परत करून आपले व्यवसाय बंद केले आहेत. त्यात मॉर्गन स्टेनली इंडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, संकल्प ग्रेनाईट प्रायव्हेट लिमिटेड, इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, शिर्डी क्रेडिट अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मंगलम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, धोलाधर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, गुडविल फायनान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि पश्चिम बंगाल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami