वाशीम- काही लोक गरीब असले तरी प्रामाणिक असतात. प्रामाणिकपणाचे असेच एक उदाहरण वाशीम येथील रस्त्यावर बघायला मिळाले आहे.एका इसमाचे हरवलेले दागिने रस्त्यावर कांदा बटाटा विकणाऱ्या एका विक्रेत्याला मिळाले आणि त्याने ते स्वतःहून परत केले.
वाशिम जिल्ह्यातील एरंडा येथील रमेश घुगे यांचे हे दागिने आणि रोकड आहे. घुगे यांनी हे दागिने बँकेत गहाण ठेवले होते. बँकेतून सोडवून आणलेले हे ७७ ग्राम सोन्याचे दागिने ३५ हजार रोख रक्कम घरी घेऊन जात असताना घुगे यांच्याकडून गहाळ झाले. मात्र, वाशीम शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात आपला कांदा, लसूणचा व्यवसाय करणारे शेख जाहेद यांना हे दागिने मिळाले. शेख जाहेद यांच्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील रमेश घुगे यांच्या घरी मुलाचं लग्न असल्याने बँकेत असलेले ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख ३५ हजार असे एकूण अंदाजे८लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हरवला होता. त्यामुळे लग्न होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र कांदे विकणाऱ्यानी मुद्देमाल परत केल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.