संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

10 आणि 12 वीच्या फेरपरीक्षेचा उद्या ऑनलाईन पद्धतीने निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email


मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर- ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या बुधवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे..या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच यावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असल्याने यावेळी विद्यार्थ्यांना प्रिंट आउट घेता येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२१ आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.या परीक्षेत कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन घेता येईल यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेस्थळावर स्वतः किंवा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami