संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अहमदाबाद बॉम्ब स्फोट खटल्यातील ३८ दोषींना फाशी, ११ जणांना जन्मठेप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद – अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील ३८ दोषी आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यातील अन्य ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात ५६ जण ठार, तर २०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीत ४९ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांच्या शिक्षेची आज सुनावणी झाली.

गुजराच्या अहमदाबादमध्ये जुलै २००८ मध्ये २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून यातील आरोपींना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला दाखल केला होता. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. पटेल यांनी ८ फेब्रुवारीला खटल्याचा निकाल देताना ४९ जणांना दोषी ठरवले होते. ७७ पैकी २८ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या साखळी बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता. २०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. या संवेदनशील खटल्याचा आज निकाल लागला. त्यात न्यायालयाने ३८ जणांना फाशीची तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami