मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षांचे प्रवेशपत्र आजपासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ुुु.ारहरहीीलेरीव.ळप या संकेतस्थळावर आज दुपारी 1 वाजल्यानंतर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून देण्यात आली आहे.
प्रवेशपत्र मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. दरम्यान, प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबधित ऑनलाइन प्रवेशपत्र सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. प्रवेशपत्रात विषय आणि माध्यम बदलासंदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या आहेत, अशी माहितीही शासनाने दिली आहे.