सध्या अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. यापैकी एक म्हणजे पिल इटालिका लाइफस्टाइल लिमिटेडचा शेअर. या पेनी स्टॉकने केवळ 12 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच पिल इटालिका लाइफस्टाइल लिमिटेड शेअरच्या विक्रीचा दबाव होता आणि 5.90 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरही पोहोचला. 27 डिसेंबर 2021 रोजी स्टॉक 7.45 रुपयांवर वर बंद झाला, तर 12 जानेवारी 2022 रोजी, शेअर NSE वर 16 रुपयांवर बंद झाला. या समभागाने केवळ 12 ट्रेडिंग सत्रांमध्ये 115 टक्के परतावा दिला आहे.
या कंपनीच्या शेअरने रु. 10.40 वर नवीन ब्रेकआउट दिल्यानंतर जोरदार वाढ झाली. येत्या ट्रेडिंग सत्रात या समभागात काही नफा-वसुली दिसू शकते परंतु एकूणच या पेनी स्टॉकसाठी उत्साह कायम आहे. अल्पावधीत हा शेअर 19-20 रुपयांची पातळी दाखवू शकतो, असं तज्ज्ञांचे मत आहे.