13 फ्रेेंच स्पर्धा विजेता राफेल नादाल पराभूत

पॅरिस- विक्रमी 13 वेळा फ्रेेंच ग्रॅँडस्लॅम स्पर्धा विजेत्या राफेल नादालला यंदा मात्र उपांत्य फेरीतच जोकोविचकडून अटीतटीच्या लढतीत 4 सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. विश्‍वातील दोन अव्वल खेळाडुंमध्ये हा सामना तब्बल चार तास रंगला. त्यामुळे या स्पर्धेेतील 14 वे आणि ग्रॅँडस्लॅम स्पर्धेेतील 21 वे विक्रमी विजेतेपद मिळवण्याचे नादालचे स्वप्न भंग पावले. आतापयर्र्ंत खेळलेल्या एकुण 105 सामन्यांत केवळ तिसर्‍यांदा नादाल पराभूत झाला. या स्पर्धेेत नादालला 2 वेळा पराभूत करणारा जोकोविच पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 2015 मध्ये जोकोविचने नादालला उपांत्यफेरीत नमविले होते.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami