संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

19 बंगल्यांवरुन उद्धवजी काहीच का बोलत नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज नरिमन पॉईंटच्या भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरेंसह शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांवर कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या प्रकरणावरुन जोरदार टीका केली. किरीट सोमय्या म्हणाले की,कोर्लई गावातील 19 बंगल्यांवर उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाही? बायकोची बाजू घ्यायची नाही? ते सरपंचाला पुढे करत आहेत. शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यामध्ये या प्रकरणावर बोलण्याची हिंमत नसल्याची सोमय्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना 23 मे 2019 आणि जानेवारी 2019 रोजी पाठवलेल्या पत्राचेही वाचन केले. किरीट सोमय्या म्हणाले की, या पत्रात रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून जमिन खरेदी करण्याचे म्हटले आहे. आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहणार, असे रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी पत्रात नमूद केले होते. या पत्रावर सरपंचांची सही आहे. उद्धव ठाकरे यांना पत्नीची बाजू घ्यायची नाही काय? मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.

पुढे सोमय्या म्हणाले की, 11 ऑक्टोबर 2021 रोजी संजय राऊतांनी मला पत्र लिहिल होते. त्या पत्रात राऊत म्हणाले होते की, प्रिय श्री किरीट सोमय्याजी, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार आणि शासकीय पैशाचा अपहार आदी अनेक प्रकरणे आपण उघड केले. हे राष्ट्रावर उपकार झाले. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावे, असे राऊतांनी या पत्रात म्हटले. राऊत कौतुक करतात आणि आता मुख्यमंत्र्यांपासून इतर लोक म्हणतात सोमय्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, अशी टीका सोमय्यांनी केली. ईडी अधिकार्‍याने माझ्या प्रकल्पात पैसे दिल्याचा आरोप केला. मी विचारतोय, कुठल्या अधिकार्‍याला दिले? त्या अधिकार्‍याबद्दल मी तक्रार दाखल करतो. पालघरच नाव घेतले, पालघरच्या जमीनचे व्हॅल्युएशन ठाकरेंच्या कलेक्टरने केले आहे. तिथून बुलेट ट्रेन जाते, 15 कोटीचे व्हॅल्युएशन, 260 कोटींचे ईडीचे इन्व्हेस्टमेंट?. तसेच ईडीच्या कार्यालयावर दोन ट्रक पेपर घेऊन जाणार असे ते म्हणाले. काय सेन्शेशन करता? 7500 कोटी अमित शाहा, फडणवीस यांना दिले असं ते म्हणतात. राज्य सरकारकडे तक्रार रजिस्टर करायची असते, मग ईडीकडे जायचे असते. असे सोमय्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami