संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

मतदानाआधी मणिपूरमध्ये स्फोट; लहान मुलासह 2 मृत, 5 जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चुराचांदपूर – सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीचा जल्लोष सुरु आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून मात्र मणिपुरमध्ये हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी उद्या 28 फेब्रुवारीला आणि 5 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात मतदानाच्या दोन दिवस आधी काल रात्री चुराचांदपूर जिल्ह्यातील गँगपिमुअल गावात स्फोट झाला. या स्फोटात एका लहान मुलासह दोन जण ठार आणि पाच जण जखमी झाले आहेत. हा स्फोट कोणी घडवुन आणला याविषयी अद्याप माहिती नसुन पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत. या स्फोटानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत यातील स्फोटाचे हे प्रकरण ही हिंसाचाराची पहिली मोठी घटना होती. राज्यातील निवडणुकीशी संबंधित हिंसाचार वाढला असताना मणिपुरचे राज्यपाल ला गानेसन यांनी काही दिवसापुर्वी हिंसाचार टाळण्याचे तसेच अनुचित प्रकार घडु नये आणि शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी असे आवाहन केले होते. मात्र हिंसाचाराची प्रकरणे काही थांबताना दिसत नाहीत. मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सस्फोटामुळे मुलांसह सात जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मंगमिनलाल (6) आणि लांगिनसांग (22) या दोघांचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami