संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

ABG शिपयार्ड कंपनीने २८ बँकांना लावला चुना, तीन हजार कोटींहून अधिक कर्ज लहान बँकांकडून

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जहाज निर्माती कंपनी एबीजी शिपयार्डने २०१२ ते २०१७ या काळात देशातील तब्बल २८ बँकांकडून कर्ज घेतले होते. या बँकामध्ये सरकारी बँकांसोबतच खासगी आणि लहान बँकांचाही समावेश आहे. ABG शिपयार्डचे माजी अध्यक्ष आणि MD ऋषी कमलेश अग्रवाल यांनी SBI च्या नेतृत्वाखालील बँकांच्या ग्रुपकडून सुमारे 22,842 कोटी रुपयांचे मोठे कर्ज उभारले. यामध्ये खासगी क्षेत्रातील ICICI बँकेचा सर्वाधिक वाटा होता. या बँकेने एकट्या कंपनीला 7,089 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कंपनीने घेतलेल्या एकूण कर्जाच्या एक तृतीयांश आहे.

एलआयसीची मोठी होल्डिंग कंपनी असलेल्या आयडीबीआय बँकेलाही ABG शिपयार्डने मोठा तोटा दिला आहे. या बँकेकडून कंपनीने 3,639 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय SBI कडून 2,925 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,244 कोटी रुपये, एक्झिम बँकेकडून 1,327 कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 1,244 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाकडून 719 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

सरकारी आणि मोठ्या खासगी बँकासोबतच एबीजी शिपयार्ड कंपनीने लहान बँकांनाही चुना लावला आहे. लहान बँकांकडून या कंपनीने तब्बल ३ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. एकूण कर्जापैकी 19,801 कोटी रुपये 8 मोठ्या बँकांकडून घेतले गेले तर उर्वरित 3,041 कोटी रुपये 20 बँकांकडून उभे केले गेले. 2012 मध्ये, ऑडिट फर्म अर्न्स्ट अँड यंगने पहिल्यांदा कंपनीच्या आर्थिक स्थितीतील उल्लंघन आणि अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami