संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सतीश कौशिक यांचा मृत्यू
संशयास्पद पोलिसांचा दावा

नवी दिल्ली- बॉलिवूड दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि कॉमेडियन सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. सतीश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आता या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये राहत होते, तिथून दिल्ली पोलिसांना काही औषधे सापडली आहेत, ज्याची चौकशी सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम टीमला गुरुग्राममधील पुष्पांजली फार्महाऊसमधून काही औषधे मिळाली आहेत. सतीश यांचा मृत्यू झाल्याच्या रात्री येथेच मुक्काम होता. वास्तविक ते मित्राच्या निमंत्रणावरून गुरुग्राममध्ये होळी साजरी करण्यासाठी गेले होते. येथेच रात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फार्महाऊसवर कोण होते याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. त्यांना रुग्णालयात कधी नेण्यात आले? त्यांनी काय खाल्ले आणि काय प्यायले इथपासून ते पाहुण्यांच्या यादीपर्यंत सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस पाहुण्यांची यादी तपासत आहेत. या पार्टीत जो उद्यागपती होता त्याची चौकशी करणे अजून बाकी आहे. दरम्यान पोलिसांना सतीश कौशिकच्या खोलीतून काही औषधे सापडली असून त्यात मधुमेहापासून ते गॅस सारख्या नियमित औषधांचा समावेश आहे. पण काही औषधे आहेत ज्यांची चौकशी केली जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या