संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

5 खासदारांच्या पत्रानंतर काँग्रेसने अध्यक्षपद निवडणुकीतील नियम बदलले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल झाला आहे.5 खासदारांच्या पत्रानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेबाबत निर्णय घेतला, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी 20 सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल. असे काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
काँग्रेसच्या 5 खासदारांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना मधुसूदन निस्त्री म्हणाले की, जर एखाद्या नेत्याला वेगवेगळ्या राज्यातून 10 समर्थकांची उमेदवारी मिळवायची असेल तर 20 सप्टेंबरनंतर काँग्रेसच्या दिल्लीतील माझ्या कार्यालयात सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी उपलब्ध असेल. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक नेते या यादीतून त्यांचे 10 समर्थक निवडू शकतात आणि त्यांची स्वाक्षरी करून पाठिंबा मिळवू शकतात. त्यानंतर 24 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami