बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमवर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ थर्सडे’ मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाद्वारे बलात्कार पीडितेची भूमिका करणारी अभिनेत्री यामी गौतम हिने लैंगिक अत्याचार पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे.
अशा परिस्थितीत आज यामी गौतमने आपल्या क्षमतेनुसार याच्या सुधारणेसाठी योगदान देण्याची घोषणा केली असून यासाठी तिने लैंगिक अत्याचार पीडितांना आधार देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. याविषयी बोलताना यामी म्हणाली की, “आज मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छिते की मी लैंगिक अत्याचार पीडितांच्या पुनर्वसनासाठी सक्रिय असणाऱ्या आणि सर्वतोपरी मदत करणाऱ्या अशा दोन अशासकीय संस्थांशी (एनजीओ) जोडून घेतले आहे. महिलांनी या समस्यांवर काम करण्याची आवश्यकता असून सुरक्षेच्या समस्या आजही अस्तित्वात आहेत. याविषयी प्रगती होत असली तरीही, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या दोन एनजीओशी माझा संबंध ही सुरुवात असून भविष्यात सर्व स्तरातील महिलांच्या संरक्षणासाठी अधिक चांगल्या पद्धतीने मदत आणि योगदान देण्याची माझी इच्छा आहे.”
. प्रत्येक छोटेसे पाऊल समाजात मोठे बदल घडवून आणू शकते. आपल्या समाजात आजही महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा मोठ्या समस्या दूर करण्यासाठी तिने लोकांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे.