संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

Budget 2022: देशात ४०० नव्या वंदे भारत ट्रेन सुरू करणार; ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजना राबवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी त्यांनी रेल्वेसाठी मोठी योजना जाहीर केली. येत्या तीन वर्षांत देशात ४०० नव्या वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, लहान शेतकरी आणि उद्योगांसाठी रेल्वे कुशल लॉजिस्टिक्स विकसित करणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादन देशभर पोहोचवण्यात मदत होईल. यातून एक स्टेशन एक उत्पादन योजना सुरू करण्यात येमार असून यातून देशाचा विकास होईल असा दावा सीतारामन यांनी केला आहे.

तसेच, रेल्वेचं जाळं विकसित करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. मेट्रोच्या विकासासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांंगितले. दरम्यान, रेल्वे आणि मेट्रोचा विकास करताना रस्ते विकासासाठीही पीपीपी मॉडेल उभारणार असल्याचे सांगण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami