लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लॉकडाऊनमधून सूट द्या, अजित पवार करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरीही धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे राज्यातील निर्बंध अद्यापही उठवण्यात आलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लॉकडाऊनमधून सूट देता येते का यासंदर्भात मुख्यमंत्री उद्घाव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. पिंपरी-चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्यानं हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोते उद्योगधंदेही ठप्प आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर लॉकडाउन हळूहळू उठेल, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं सरकारनं पूर्ण लॉकडाउन उठवणं टाळलं आहे.

यावर अजित पवार म्हणाले, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत करोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात. अशी बेफिकिरी योग्य नाही,’ असं ते म्हणाले.

‘केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लस मिळायला हवी. मात्र, तसं होताना दिसत नाही. लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ‘पूर्वी लोक लस घ्यायला घाबरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असंही ते म्हणाले.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami