संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

अमित ठाकरेंच्या खांद्यावर मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्षपदाची जबाबदारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा दिनाचा मुहूर्त साधून मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची आठवण झाली. त्यांनीही शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करून राजकारणात प्रवेश केला होता. आता त्याच वाटेवर त्यांचे पुत्र अमित ठाकरे आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी नाशिकचा दौरा केला होता. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची धुरा त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भोवती राजकीय वलय निर्माण होत आहे. असे असतानाच मनसेने आज काढलेल्या पत्रकात त्यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा दिन दणक्यात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आपल्या भाषेचा हा गौरव दिवस आहे. तो जोशात आणि दिमाखात साजरा व्हायला हवा, असे त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami