अनन्या बिर्लाचा ‘व्हेन आय एम अलोन’चा व्हिडीओ प्रदर्शित

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

युवा पीढीची एक यशस्वी गायक आणि संगीतकार, अनन्या बिर्ला हिने ‘हिंदुस्तानी वे’च्या भारी यशानंतर आपला बहुप्रतीक्षित ट्रॅक ‘व्हेन आय एम अलोन’चा बहुप्रतीक्षित म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. ‘हिंदुस्तानी वे’च्या अफाट लोकप्रियतेनंतर हा तिचा नवा प्रोजेक्ट आहे, जे ए आर रहमान सोबतचे तिचे पहिले योगदान होते आणि भारतातील खेळ जगतासाठी एंथम बनले होते.

आज जग महामारीच्या आणि प्रचंड नैराश्याच्या गर्तेतून जात आहे. ‘व्हेन आय एम अलोन’मध्ये हे दाखवण्यात आले आहे की आयुष्यात गोष्टी कशा आकार घेतात, कशा त्यातल्या काही गोष्टी आपोआप गळून पडतात. हा रिफ्लेक्टिव ट्रॅक, ‘सेल्फ लव’बाबत असून यातील अनुभव कसा व्यक्तिला विकसित करण्यासाठी आणि त्याच्या परिप्रेक्ष्याला बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ स्वतः अनन्याने दिग्दर्शित केला असून स्वतःच्या आयुष्यातील जसे आहेत तसे, क्षणांना यात चित्रित केले आहेत. प्रासंगिक, वास्तविक आणि प्रामाणिक असा हा ट्रॅक आपल्या सद्यस्थितीचे विशेष प्रासंगिक रूप आहे कारण संपूर्ण जग आज एका वैश्विक महामारीसोबत झगडत आहे.

अनन्या बिर्ला आपल्या या गाण्याविषयी म्हणते की, “मी ‘व्हेन आय एम अलोन’मध्ये माझ्याविषयी जेवढे होऊ शकेल तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की माझा जन्म कुठे झाला, मी पहिल्यांदा डेटवर कुठे गेले होते, अशा अनेक गोष्टी, ज्यांनी माझे स्वत्व न हरवता मला आकार दिला आहे. मी या म्युझिक व्हिडीओबाबत खरोखरच खूप उत्साहित आहे आणि हा व्हिडीओ सर्वांना दाखवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.”

महत्त्वाची गोष्ट ही आहे की, या मल्टी-talented कलाकाराने ‘व्हेन आय एम अलोन’च्या या म्युझिक व्हिडीओला स्वतः लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. हे गीत त्याच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि आता संगीत प्रेमींसाठी प्रदर्शित झाले आहे.

Close Bitnami banner
Bitnami