संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

नागपुरात ८० वर्षांच्या आत्माराम ठवकर यांनी स्वतःचे सरण रचून केली आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – गळफास, विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येतात. पण स्वतःचं सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःचं सरण रचून विधिवत पूजा-अर्चना करून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी गावाबाहेरील त्यांच्या शेतात घडल्याची माहिती समोर आली आहे.

आत्माराम ठवकर हे वारकरी होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. ते आजारी असायचे. मात्र, अशाप्रकारे आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय असावे, याबाबत गावात जोरदार चर्चा सुरू आहे. आत्माराम यांनी आत्महत्या केली त्यादिवशी गावातील मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील नाटकाचा त्यांनी आनंद घेतला. आत्माराम पहाटे पाच वाजता शेताकडे आले. शेतातून लाकडे गोळा करून सरण रचले आणि त्यावर सुकं गवत टाकलं. आत्मारामांनी सरणाची आधी पूजा केली असावी असा कयास आहे. कारण सरणाजवळ दिवा पेटत असल्याचे पहायला मिळाले. तसेच सरणाजवळ पानाचा विडा ठेवलेला होता. पूजा झाल्यावर आत्मारामांनी सरण पेटवून त्यावर उडी घेतली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. कारण त्यांचा मृतदेह अर्धवट जळाला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. वेलतूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला असून त्यांना वेलतूर येथे मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी आकस्मिक नोंद घेत तपास करत आहेत. दरम्यान, ८० वर्षीय वृद्धाने आपले सरण रचून आत्महत्या कशी काय केली असावी, एक वृद्ध माणूस आत्महत्येचा विचार करत स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या कशी करू शकतो? असे अनेक प्रश्न गावात चर्चिले जात आहेत. मात्र, याप्रकरणी आत्माराम यांच्या कुटुंबीयांचे काहीही म्हणणे नसल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आकस्मिक मृत्यूची नोंद करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami