संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

बप्पी लहिरिंना का होती दागिन्यांची आवड? किती तोळे सोने होते त्यांच्याकडे?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी आज मुंबईत निधन झालं. डिस्को गाण्यांसाठी ते ओळखले जायचे. तसेच त्यांनी परिधान केलेल्या दागिन्यांमुळेही ते ओळखले जायचे. म्हणून त्यांना गोल्डन मॅन म्हटलं जायचं. सोन्याच्या दागिन्यांची त्यांना विशेष आवड.

‘Elvis Presley हे अमेरिकन गायक ह़ॉलिवूडमध्ये सोन्याची साखळी गळ्यात घालत असत. मला ते फार आवडत होते. त्याचवेळी मी ठरवलं की मी यशस्वी होऊन ते यश वेगळ्या पद्धतीने साजरा करेन. त्या क्षणी मी खूप सारं सोनं वापरू लागलो, सोनं माझ्यासाठी भाग्याचं प्रतीक आहे’, असं बप्पी लहिरी एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते.

त्यांच्याकडील दागिने पाहिल्यावर कोणाही सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडला असेल की यांच्याकडे नक्की किती तोळं सोनं असेल? एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की त्यांच्याकडे एवढे दागिने आहेत की त्या पैशांत साधारण ४ ऑ़डी या महागड्या गाड्या विकत घेतल्या जातील. त्यांच्या दागिन्यांची किंमत ही साधारण 12 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, या आकड्यामध्येही खरा आकडा मात्र कायम गुलदस्त्यातच राहिला. काही वर्षांपूर्वी बप्पींनी इलेक्शन कमिशनकडे दिलेल्या पत्रकातील माहितीप्रमाणे त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आहे. याची किंमत त्यावेळी 1767451 इतकी दाखवण्यात आली होती. तर त्यांच्या पत्नी चित्रानी यांच्याकडे 967 ग्रॅम इतकं सोनं होतं. ज्याची किंमत 2074830 रुपये इतकी होती.’Disco King’ अशी ओळख असणाऱ्या बप्पी दा यांच्याकडे चांदीचेही तितकेच दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे आणि त्यांच्याकडे मिळून प्रचंड सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा खजिना होता.

बप्पींची अस्थायी संपत्ती ही 2.93 कोटी रुपयांची तर, अस्थायी संपत्ती 9 कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु हा आकडा काही वर्षांपूर्वीचा असल्यामुळे आजच्या दिवसापर्यंत साहजिकच त्यात भर पडली असणार ही बाब नाकारता येत नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami