मुंबई – राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात पडसाद उमटले. टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “हे पाहा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन.” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितलं.
तर, राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. खासदार उदयनराजे भासले यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. तसेच, राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा अशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केली आहे.