संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

जाणून घ्या! हाडांना मजबूत कसे बनवाल?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शरीराला आकार व आधार देण्यासाठी हाडांचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शरीरात एकूण २०६ हाडे आढळून येतात. हाडे म्हणजेच बोन्स हे सर्वात कठीण असे कनेक्टिव्ह टिशू मानले जातात. आयुर्वेदानुसार याची गणना अस्थिधातूमध्ये होते.

हाडांमध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात तसेच इतर काही मिनरल्स जसे कि फॉस्फरस, मॅग्नेशियम व कोलॅजन फायबर्स ऑस्टिओसाईट्स व काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो. हाडांमुळे शरीराला मजबुती येते. तसेच शरीरातील नाजूक अवयवांचे संरक्षण होते. हाडांच्या आतील अस्थिमज्जा रक्तपेशी बनवण्याचे कार्य करतात तसेच हाडांमुळे स्नायूंना आधार मिळतो. त्यामुळे या अस्थिधातूचा पोषकांश टिकवून ठेवण्यासाठी खालील मार्गाचा अवलंब जरूर करावा. याविषयी अधिक माहिती देत आहेत आयुर्वेदाचार्य डॉ. पूजा भिंगार्डे.

१) कॅल्शिअम – आपल्या शरीराला दररोज १००० – १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते त्यासाठी आपण दूध, दुग्धजन्य पदार्थ जसे कि लोणी, तूप, नाचणी, विविध प्रकारच्या डाळी तसेच कठीण कवचाची फळे जसे कि अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू, यांचा वापर करावा. तसेच तीळ, मेथीचे दाणे, भोपळ्याच्या बिया, सोयाबीन्स, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारातील वापर वाढवावा.

२) व्हिटॅमिन डी – आहारातील कॅल्शिअम शोषून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. यासाठी रोज सकाळी कोवळे ऊन १५ ते २० मिनिटे अंगावर घ्यावे. तसेच अंडी, मांसाहार याचा काही प्रमाणात समावेश करावा.

३) व्यायाम – नियमित व्यायाम करणे तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे स्नायूंची जखडणं होत नाही व सर्व हालचाली नियंत्रितपणे होतात. त्यासाठी त्रिकोणासन , सेतुबंधासन , भुजंगासन, वीरभद्रासन, विपरीतकरणी मुद्रा यांसारख्या आसनांचा समावेश करावा.

४) पंचकर्म व आयुर्वेदिक औषधे – पंचकर्मातील काही औषधे वापरून बनविलेल्या दुधातुपाच्या बस्तीचा हाडांना बळ देण्यासाठी वापर केला जातो. तसेच आयुर्वेदामध्ये कॅल्शिअम असलेले द्रव्य वापरून बनविलेल्या औषधांचाही आपण वापर करू शकतो. जसे कि अस्थिपोषक वटी, लाक्षादी गुग्गुळ.

टीप – या औषधांचा वापर वैद्यांना विचारूनच करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami