नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थ संकल्पात त्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी भरीव तरतूद केली असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यामुळे जवळपास ६० लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचेही सांगण्यात आले.
शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशानं सुरू केलेले पूरक शिक्षण प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा केली आहे. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होतं. मात्र आता ही संख्या वाढवून 200 करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे.
60 लाख लोकांना मिळणार रोजगार
देशात वाढत जाणारं बेरोजगारीचं प्रमाण लक्षात घेता. देशात येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना थोडा दिलासा मिळाला आहे.