नवी दिल्ली – गेल्या काही वर्षात पंतप्रधान आवास योजनेचा चांगला लाभ झाला आहे. या योजनेतून अनेकांनी सबसिडी घेतली आहे. त्यात आता 2023 पर्यंत सरकार 80 लाख नवीन घरं बांधणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी 48 हजार कोटींची तरतूद केली आहे.
2022-23 चे अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, देशातील दुर्बल घटकांना तसेच केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या उद्देशासाठी या वर्षीच्या अर्थ संकल्पात 48 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. त्यामध्ये 80 लाख नवीन घरं बांधण्यात येतील
दुर्बल घटकातील लोकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे याकरता पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येते. या योजनेतून २.६७ लाखांपर्यंत सबसिडी मिळू शकते. नवीन घर खरेदी केल्यावर, लोकांना गृहकर्जावर सरकारकडून सबसिडी मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो.