संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

Budget 2022: देशात येणार 5जी नेटवर्क

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारतात 5जी नेटवर्कचे वारे वाहत आहेत. भारतात तर 5जी नेटवर्कसाठी मोबाईलही लाँच करण्यात आले आहेत. त्यातच आता आनंदाची बातमी म्हणजे देशात लवकरच 5जी नेटवर्क येणार आहे. यंदाच्या अर्थ संकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली.

2022 मध्ये खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड आणि मोबाईल कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी PLI योजनेचा एक भाग म्हणून 5G इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल, असेही सीतारामन म्हणाल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami