मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे विधानभवनात सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणात धडधडीत खोटे (lied) बोलले. त्यांचे अहवालाबाबतचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राला आणि संविधानाला (Indian Constitution)कलंक लावण्याचे काम आहे. माझ्या मुलाला पोलिसांनी मारले. घाटी रुग्णालयात न्यायधीशांसमोर त्याचे शवविच्छेदन केले तो अहवाल खोटा आहे का, असा सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केला.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील (Dr. Babasaheb Ambedkar’s statue) संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून सोमनाथ सूर्यवंशीला अटक (arrested)केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत (judicial custody)त्याचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात (winter session in Nagpur)शवविच्छेदन अहवालात (postmortem report)सोमनाथला श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे म्हटले. तसेच त्याच्या शरीरावरील जखमा जुन्या होत्या, असे सांगितले. त्याचा मृत्यूच्या सुरुवातीच्या कारणांमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इन्ज्युरीज हे कारण असल्याचेही म्हटले होते. तर पावसाळी अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांनी हिस्टोपॅथोलॉजीच्या अहवालानुसार, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीनही मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा (triple vessel disease) असल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले. हे दोन्ही अहवाल मुंबईतील जे.जे. शासकीय रुग्णालायत (J.J Hospital i)पाठवण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे (coronary syndrome) झाल्याचे म्हटले. सरकार अजूनही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.
या विरोधाभासी अहवालांवर प्रश्न उपस्थित करत विजयाबाई सूर्यवंशी (vijayabai Suryawanshi) म्हणाल्या की, माझ्या मुलाला पोलिसांनी मारले. त्याचे शवविच्छेदन न्यायाधीशांसमोर करण्यात आले. मग तो अहवाल खोटा आहे का? जे. जे रुग्णालयाने जो अहवाल तयार केला, त्याची परवानगी आमच्याकडून घेण्यात आली नाही किंवा आम्हाला त्याबद्दल सांगण्यातही आले नाही. फडणवीसांचे वक्तव्य ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आणि मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला होता. तिथल्या डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन केले. त्यांच्या अहवालात पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. माझ्या मुलांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका.