कोकणची चिंता वाढली; गणपतीसाठी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण

corona, coronavirus, virus-5401250.jpg
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – गणपती उत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २७२ जणांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोना चाचणीमध्ये रत्नागिरीत १२० तर सिंधुदुर्गात १५२ रुग्ण आढळून आले आहेत. आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने कोकणवासियांची चिंता वाढली आहे.

वाचा शैक्षणिक फी माफीची पूर्तता न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा

सध्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरु करण्यात येत आहेत. गणपतीसाठी गावी गेलेल्यांसाठी कोविडचे नियम कडक करण्यात आले होते. रेल्वे स्थानक आणि गाव पातळीवर कोरोनाची चाचणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काळजी घेण्यात आली. मात्र, २७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. तसेच कोकणात जाण्यासाठी प्रचंड गर्दीही झाली होती. त्यामुळे या २७२ जणांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेतला जात असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका असल्याचे संकेत दिले जात आहेत.

Close Bitnami banner
Bitnami