नवी दिल्ली – देशात प्राणघातक कोरोना व्हायरस साथीच्या रुग्नांमध्ये मोठी घट झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवण्यात येत आहे. कालच्या तुलनेत आज ही घट १६ टक्क्यांनी कमी झाली असालीची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना रुग्नांच्या वाढत्या संख्येत आता बऱ्याच प्रमाणात घट झाली असून गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १३ हजार १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या खाली आली आहे. तसेच याआधीच्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत १६ टक्क्यांनी घट झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. सध्या देशात १ लाख ३४ हजार २३५ एक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन कोरोना संसर्ग दर १.२८ टक्के आहे.
आतापर्यंत देशातील ४ कोटी २२ लाख ४६ हजार ८८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण ५ लाख १३ हजार २२६ जणांचा बळी घेतला आहे.देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७६ कोटी ८६ लाख ८९ हजार २६६ डोस देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत १.९५ कोटी बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत पुरवण्यात आलेल्या १७२ कोटी ९८ लाख २९ हजार ३७० डोस पैकी १० कोटी ७९ लाख ७५ हजार २७२ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.