मुंबई – मुंबईत गेल्या २४ तासांत ८४६ नवे कोरोना बाधित सापडले असून १ हजार २९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, गेल्या २४ तासांत सात जणांच्या मृतांची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतीली कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आला आहे. मृतांची संख्याही अटोक्यात येत असून कोरोनातून बरे होण्याच्या रेटमध्येही वाढ होत आहे. ली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1,023,589 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचला आहे.
सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 7,135 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 662दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.10% टक्के इतका झालाय. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या मुंबईतील 3 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 846 रुग्णांपैकी 111रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 211 बेड्सपैकी केवळ 1 हजार 37,211बेड वापरात आहेत.