CoronaUpdate: राज्यात ९६० नवे रुग्ण, बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्क्यांवर

corona, coronavirus, virus-5174671.jpg
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  1043 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 78 हजार 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.

राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 366  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 84 हजार 261  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 49 , 51, 994 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत आज 258 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात मुंबईत 258 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर चार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 287 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2353 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,40,547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2353 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. 

Close Bitnami banner
Bitnami