संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

महागाई वाढणार? कच्च्या तेलाच्या दराने मोडला सात वर्षांतील उच्चांक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कबंरडे मोडले होते. मात्र, आता रशिया – युक्रेन यांच्यातील युद्धामुळेही आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून गेल्या सात वर्षांतील हा सर्वाधित उच्चांक असल्याचं म्हटलं जात आहे. कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रति बॅरल झाले असून येत्या दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

रशिया देश हा कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक आहे. युरोप, भारतसह अनेक देशांत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. मात्र, युद्धामुळे तेलाचा पुरवठा खंडीत झाला असून येत्या काळात कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होऊ शकते. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यास सर्वच उत्पादनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या दरात एक डॉलरने वाढ झाल्यास इंधन दरात ४० पैशांची दरवाढ केली जाते. एक डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 68 डॉलर इतका होता. त्यानंतर आता 110 डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला आहे.विधानसभा निवडणुकांमुळे जवळपास तीन महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात किमान 16 रुपयांची वाढ करावी लागू शकते. मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे 7 मार्चनंतर इंधर दरवाढीचा भडका उडण्याची भीती आहे. 

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami