संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; श्रीलंकेत पेट्रोलच्या दरात उसळी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतात पेट्रोलने शंभरी ओलांडलेली असताना इतर देशांतही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. श्रीलंकेत पेट्रोलच्या किंमतीत २० रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत १५ रुपये प्रतिलिटरने वाढ झाली आहे. श्रीलंकेने या महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ केली असल्याने आता श्रीलंकेत पेट्रोल २०४ रुपये तर डिझेल १३९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने जगभरातील अनेक देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात १२ रुपये प्रतिलिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे तिकडे पेट्रोलचा दर १५९.८६ रुपये प्रतिलिटर पोहोचला आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने दरवाढ स्थिर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका संपल्यावर दरवाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami