राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या DB Realty या शेअरची किंमत 48.90 रुपयांवरून 100.15 रुपयांपर्यंत वाढली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या शेअरचा चार्ट पॅटर्न अजूनही तेजीचा आहे आणि तो लवकरच 120 आणि 135च्या पातळीवर जाऊ शकतो. मात्र केवळ चार्ट पॅटर्नवर हा शेअर तेजीत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक चार्ट पॅटर्नवर खूप तेजीचा दिसत आहे. मात्र 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये तो सातत्याने अप्पर सर्किट लगावत आहे. ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी तो 120 रुपयांच्या पहिल्या टार्गेटसाठी आणि 135 रुपयांच्या पुढील टार्गेटसाठी होल्ड करून ठेवावा, असे तज्ज्ञ म्हणतात.
शेअर इंडियाचे रवी सिंग म्हणतात की, डीबी रियल्टीचा तांत्रिक सेटअप या शेअरमधील अपट्रेंडला सपोर्ट देत आहे. डीबी रियल्टीच्या फंड उभारणीशीसंबंधित बातम्यादेखील या स्टॉकला चालना देत आहेत.