२ रुपयाच्या पेनी स्टॉकची किंमत झाली १४५ रुपये, गुंतवणूकदारांना ५ हजार टक्के परतावा

गेल्या अनेक महिन्यांपासून पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगले मालामाल केले आहे. त्यामुळे अनेकजण पेनी स्टॉक मध्ये गुंतवता दिसत आहेत. त्यातच लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगसारख्या सेवा पुरवणार्‍या Flomic Global Logistics कंपनीनेही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

८ फेब्रुवारी २०२१ रोजी या शेअरची किंमत २.९३ रुपये होता. मात्र आता या शेअरची किंमत १४५ रुपये आहे. म्हणजेच वर्षभरात या कंपनीचा शेअर ५ हजार टक्के वाढला आहे. या कालावधीत सेन्सेक्स केवळ 13.41 टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्स BSE वर सूचीबद्ध 30 सर्वात मोठ्या कंपन्यांचा इंडिकेटर आहे.

वर्षभरापूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य सुमारे 50 लाख रुपयांनी वाढले असते. आजही बाजार लक्षणीय खाली असताना, हा पेनी स्टॉक ग्रीन स्थितीत आहे. BSE वर, हा शेअर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह 145 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

Scroll to Top