4 रुपयांच्या शेअरने वर्षभरात दिला 400 टक्के नफा

अमेरिकेतील महागाईमुळे भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आशियाई शेअर बाजार अस्थिर आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. मात्र दुसरीकडे अनेक पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

रिअल इस्टेट असलेली पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर वर्षभरापूर्वी 4.85 रुपये होता. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 27.15 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच वर्षभरात 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र सध्या या शेअर 19.15 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड ही एक रिअल इस्टेट कंपनी असून प्रदीप कुमार जैन यांनी या कंपनीची स्थापना केली होती. कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 24 जुलै 1990 रोजी \’पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड\’ म्हणून कंपनीचा समावेश करण्यात आला आणि 20 नोव्हेंबर 1990 रोजी व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.

Scroll to Top